अजित पवारांची पुण्याच्या जागेबाबत नमती भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघाची आगामी निवडणूक आपला पक्ष लढविणार असल्याची घोषणा करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी या जागेबाबत आता नमती भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांसाठी 2004 आणि 2009 मधील निवडणुकीच्या सूत्रानुसार जागावाटप होईल. त्यात कोण छोटे-मोठे असा भेदभाव नसेल. पुण्याच्या जागेचा वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी बुधवारी पुण्यात स्पष्ट केले. परिणामी, या जागेवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये सुरू झालेला राजकीय संघर्ष शमण्याची चिन्हे आहेत. 

पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला होता. हल्लाबोल आंदोलनादरम्यान पवार यांनी लोकसभेला पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार राहणार असल्याचे जाहीर केले होते. तेवढ्यावरच न थांबता आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्याशिवाय मी बोलत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली होती. पवार यांच्या भूमिकेवरून कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली. आपला हक्काचा मतदारसंघ असल्याचे सांगत, राष्ट्रवादीची ताकद आहे का, असा प्रश्‍न विचारत कॉंग्रेसने राष्ट्रवादीवर हल्ला केला होता. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या पार्श्‍वभूमीवर भंडारा- गोंदियाच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केल्याने यश मिळाल्याचे सांगत, पवार यांनी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. या निकालावरून आघाडीची परिणामकारकता दिसून आल्यानेच पवार यांनी पुण्याच्या जागेचा आग्रह सोडल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचे जुन्या सूत्रानुसार जागावाटप करण्याचे विधान सूचक मानले जात आहे. 

दोन्ही कॉंग्रेस पक्षांनी आघाडी करण्यासह जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. अन्य पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्यामुळे राज्यात समविचारी पक्षांचे सरकार असेल. 
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: ajit pawar NCP Pune Lok Sabha constituency