अजित पवार 'नॉट रिचेबल'

Ajit Pawar 'Not Reachable
Ajit Pawar 'Not Reachable

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचनाकपणे राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यानंतर मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोन नॉट रिचेबल येत आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अजित पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली असल्याचेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांचा अचानक राजीनामा

अजित पवार यांच्या विनंतीनुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा  मंजूर केला असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली मात्र, अजित पवार यांच्याशी कुठल्याही प्रकारचा सध्यातरी संपर्क होऊ शकत नाही.

अजित पवार यांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, म्हणतात.. 

अजित पवार हे सध्या पुण्यात असून पूरग्रस्तांची चौकशी करत असल्याचे बोलले जात असले तरी त्यांचा फोनवरून किंवा कुठल्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. दरम्यान, अजित पवार यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी का राजीनामा दिला आहे याचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com