Ajit Pawar on Devendra Fadnavis | "भिंतीवर फोटो.."; अजितदादांचं फडणवीसांना मिश्किल प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar Devendra Fadnavis
"भिंतीवर फोटो.."; अजितदादांचं फडणवीसांना मिश्किल प्रत्युत्तर

"भिंतीवर फोटो.."; अजितदादांचं फडणवीसांना मिश्किल प्रत्युत्तर

बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथेच होतो, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं. आऱोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या सतत सुरूच आहेच. फडणवीसांना संजय राऊतांचं उत्तर, पुन्हा राऊतांना फडणवीसांचं प्रत्युत्तर यानंतर आता अजित पवारांनी सुद्धा या चर्चेत उडी घेतलीये.

हेही वाचा: बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथं होतो - देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी बाबरी मशिद पडली तेव्हाची आठवण करून दिली. बाबरी पडली तेव्हा आपण तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावरून १८५७ ला सुद्धा फडणवीस होते, अशी टीका केली होती. त्यालाच आता फडणवीसांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं होतं.

ते म्हणाले होते, म्हणाले, "मी हिंदू आहे. त्यामुळे माझा पूर्वजन्मावरही विश्वास आहे आणि पुनर्जन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे जर मी पूर्वजन्मात असेन तर १८५७ च्या युद्धात झाशीची राणी आणि तात्या टोपेंसोबत मी लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्याहीवेळी तुम्ही इंग्रजांशी युती केलेली असेल. कारण आत्ताही तुम्ही अशा लोकांशी युती केली आहे, जे १८५७ ला स्वातंत्र्ययुद्धच मानत नाहीत. जे म्हणतात, ते शिपायांचं बंड होतं. त्यामुळे त्यांना जे बोलायचं ते बोलावं."

हेही वाचा: "१८५७ च्या युद्धात तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत मीही..."; फडणवीसांचा टोला

अजित पवार काय म्हणाले?

पुण्यातल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "बरं झालं असतं, भिंतीवर वगैरे त्यांचे फोटो दिसले असते. इतिहासाच्या पुस्तकात नाव दिसलं असतं." त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Web Title: Ajit Pawar On Devendra Fadnavis 1857 War Jhansi Queen Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top