दादा म्हणतात, ‘मीच होणार पालकमंत्री’

Ajit-Pawar
Ajit-Pawar

पुणे  - पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणी आणू, रिंगरोडसह वाहतूक कोंडी, हेल्मेट सक्तीतून मार्ग काढू, नव्या गावांचा विकास, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा कामांसाठी सकाळी सात वाजल्यापासूनच बैठका होतील, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण पुण्याचे पालकमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत, मीच पालकमंत्री होणार असल्याने अडचणी जाणून घेत आहे, असेही त्यांनी जाहीर केले. 

विधानसभा निवडणुकीनंतर पवार यांनी शनिवारी पहिल्यांदाच पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. चेतन तुपे, जयदेव गायकवाड, सुनील टिंगरे, रूपाली चाकणकर, दिलीप बराटे आदी उपस्थित होते. 
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार, त्याचे परिणाम आणि वस्तुस्थिती याकडे पवार यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘पुणेकर आणि शेतीला पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याची योजना आहे.

त्यासाठी टाटा कंपनीशी पक्षाध्यक्ष शरद पवार बोलतील. महापालिकेच्या शिक्षण विभागात नव्याने काही बदल करू. रस्त्यांच्या रुंदीकरणासह उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली जाईल. नगर रस्ता, सासवड रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविली जाईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com