दुटप्पी पदाधिकाऱ्यांना दादांच्या कानपिचक्या

पराग जगताप
बुधवार, 6 जून 2018

ओतूर - पुणे येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभाच्या तयारीसाठी जुन्नरला अजित पवार यांची सभा झाली. त्यावेळी दादांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एका दुटप्पी पदाधिकाऱ्याची भाषणात चांगली कानउघाडणी केल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. आपले म्हणवणारे परंतु, प्रत्यक्षात ऐन निवडणुकीत अन्य पक्षाशी युती करून सत्ता मिळविणारे व आपल्याच पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश डावलून अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध काम करणाऱ्या या पदाधिकाऱ्यावर त्यांनी चांगलाच निषाणा साधला. 

अजित पवार म्हणाले, काही जण दुटप्पी राजकारण करतात एकिकडे आमच्या बरोबर राहायचे व नतंर मागे वाटेल तसे वागायचे. त्यापेक्षा आमची विचारधारा पटत नसेल, आमच्या कामाची पध्दत पटत नसेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. चूक होते पण परत परत तीच चूक नको. परत हा दादा चांगला तो दादा चांगला असे चालनार नाही. कुठल्याही व्यासपीठावर जाऊन कुणाचेही कौतुक करायचे आणि नंतर निवडणुकीत त्याच्या विरुध्द बोलायचे याने तुमची नैतिकता संपते.

कोणी निट वागले नाही तर त्याला पुण्यातून हकलुन देईल. एवढेच सागतो पुढच्यावेळी मला कळाले की चूका चालुच आहेत, तर त्याला व्यासपीठा वरुन हाकलून देईल. आमची विचारधारा पटत नसेल तर तालुका अध्यक्षांकडे राजीणामा द्यावा. पण आपल्या प्रगतीत पक्षाचे काही योगदान आहे की नाही? गरीब व मध्यम वर्गीय नागरिकांचे एक काम केले तरी ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. मात्र मोठ्याची दहा कामे केली आणि एक करता नाई आले तरी ते वेगळे वागायला लागतात,असे चालणार नाही हा निर्वाणीचा इशारा आहे. त्यामुळे सर्वानी एकत्र येवुन शिरुर लोकसभाचा खासदार व जुन्नर विधान सभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच निवडुन आण्यासाठी एक दिलाने काम करा. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या हीतासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडुन द्या. तसेच पुणे येथे 10 तारखेला हल्लाबोल आंदोलनाची सांगता आहे. त्यातही सहङागी होणाचे आवाहन दादांनी यावेळी बोलताना केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar says be honest with the rashwadi congress