पारदर्शकतेची शपथ ही भाजपची नौटंकी- अजित पवार

ajit pawar
ajit pawar

पिंपरी : भाजपची पारदर्शकतेची शपथ म्हणजे नौटंकी आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवत हल्ला चढवला. पिंपळे सौदागर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. 

पवार म्हणाले, "भाजपच्या पुण्यातील उमेदवारांनी सिंहगडावर जाऊन शपथ घेतली. त्या वेळी त्यांचे खासदार आणि पालकमंत्री यांच्यात भांडण झाले. पिंपरीतही शपथ घेतेवेळी त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या काळात 65 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. याचाच अर्थ भाजपची शपथ म्हणजे नौटंकी आहे.'' 

"भाजप पारदर्शकपणाच्या गप्पा मारत आहे. मात्र पंकजा मुंडे यांचा चिक्‍की घोटाळा, खडसे यांचा भूखंड घोटाळा, फेक पदवी प्रकरण या सरकारला दिसत नाही का?'' असा सवालही पवार यांनी केला. 

अजित पवार म्हणाले...

  • राष्ट्रवादीला उखडून फेका ही भाषा बोलबच्चन मुख्यमंत्र्यांना शोभत नाही 
  • अडीच वर्षांत 15 मंत्र्यांची नावे भ्रष्टाचारात आली मग कारवाई का नाही? 
  • शास्तीकराच्या अध्यादेशाबाबत मुख्यमंत्र्यांचे उत्तर बालिशपणाचे 
  • भाजपचा पारदर्शकपणा म्हणजे एक विनोद झाला आहे. 
  • मुंबई मनपात घोटाळ्याचे फक्‍त आरोपच का, मग कारवाई का नाही? 
  • अधिकाऱ्यांना जादा अधिकार दिल्याने स्मार्टसिटीमध्ये फार कामे होण्याची शक्‍यता नाही. 
  • अनधिकृत बांधकाम, रेडझोनचा प्रश्‍न भाजपला दोन वर्षांत का सोडविता आला नाही. 
  • बैलगाडा शर्यत आणि पुणे- नाशिक महामार्गाच्या कामासाठी आमदार-खासदार कमी पडताहेत. 
  • शहराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष; राज्यातील गुन्हेगारीतही वाढ 
  • खून-वाहनांची जाळपोळ होत असतानाही भाजपचा "ना भय, ना भ्रष्टाचार'चा नारा. 
  • पोलिस आयुक्‍तालयाच्याबाबत दोन वर्षांत काहीच कार्यवाही नाही 
  • राज्यात गुन्हेगारांचे फावत असून, पोलिस मार खात आहे. 
  • सेटिंग पंटरांनी घरकुलाचे काम थांबविले; नागरिकच पंटरांना धडा शिकवतील. 
  • गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा कमी 
  • भाजप म्हणजे भ्रष्टाचारी अन्‌ जातीयवादी पक्ष 
  • सत्ता मिळाल्यावर आता भाजपला सहकारी पक्ष नकोसे झाले आहेत 
  • भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते 
  • भाजप सरकार फक्‍त आणि फक्‍त गाजर दाखविण्याचे काम करते 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com