अजितदादांनी चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा - चाकणकर

चंद्रकांत पाटलांची उडवली खिल्ली
अजितदादांनी चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा - चाकणकर

धायरी : अजितदादांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना टोला लगावला आहे. "देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात" असं विधान चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानाची चाकणकर यांनी खिल्ली उडवली.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली. त्या म्हणाल्या, "चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्राच सध्या निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांना माझी विनंती आहे की, त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GSTचे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल”

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

किरीट सोमय्या यांना कोल्हापूरात जाण्यापासून मुंबईत रोखल्यानंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका. यावर पत्रकारांनी त्यांना उलट प्रश्न केला की, "हाच सल्ला तुम्ही देवेंद्र फडणवीसानां दिला होता का? जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती" पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, "देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात. फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com