Video : राष्ट्रवादीच्या भविष्यावर अजित पवारांचा खूलासा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. यावर अजित पवार म्हणाले, पक्षाला नोटीस आल्याचे मी वृत्तपत्रातून वाचले आहे. त्यावर उद्या पक्षाची बैठक आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीत, नेमकी कोणती त्रुटी राहिली आहे, हे पाहून पक्ष 'त्या' नोटीशीला उत्तर देईल.​

पुणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. यावर अजित पवार म्हणाले, पक्षाला नोटीस आल्याचे मी वृत्तपत्रातून वाचले आहे. त्यावर उद्या पक्षाची बैठक आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीत, नेमकी कोणती त्रुटी राहिली आहे, हे पाहून पक्ष 'त्या' नोटीशीला उत्तर देईल. पुण्यात कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला गुरुवारी नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त 5 जागा आल्या होत्या. यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर, राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. 

राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला जमले नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा आणि देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी हे आवश्यक :
- निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.
- त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.
- त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे
- चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

भारतातील सात राष्ट्रीय पक्ष : 
भारतीय जनता पक्ष (भाजप)
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस)
राष्ट्रवादी काँग्रेस
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बहुजन समाज पक्ष
तृणमुल काँग्रेस

राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Speaks About Ncp future