'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या मतभेदांमुळे ते एनडीएमध्ये नाही. त्यामुळे ती जागा राजू शेट्टींना मिळेल असे मानेंना वाटले असेल. त्या ठिकाणी शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात. जातीवादी शक्ती विचार सोडून ज्यांना सेक्युलर विचार ज्यांना मान्य आहे अशा सर्वांना एकत्र घेण्याचा विचार आहे. 5 राज्याच्या निवडणुकीचे जे निकाल लागलेत त्यावरुन बोध घ्यायचा असतो.'' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत त्यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रवादीकडून माने गटावर झालेला अन्याय व गटाला नेहमी ग्रहीत न धरण्याचे धोरण यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री निवेदिता माने शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रमुख कार्यकर्त्यासह मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा माने गटाचा पारंपारिक मतदार संघ असताना सातत्याने माने गटाला येथे  डावलण्यात येत आहे. यंदा हा गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आला आहे. या कारणास्तव माने गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय रुकडीतील मेळाव्यात घेतला होता. शेट्टी व माने गट हे पांरपारिक राजकीय विरोधक आहेत. 

निवेदिता माने यांना राष्ट्रवादीच्या गोटातून विधानपरिषद सदस्यपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र आमदारकी तर लांबच पण माने गटाची पक्षांतर्गंत मुस्कटदाबी सुरू करण्यात आली होती. यामुळे माने गट राष्ट्रवादीवर नाराज होता.

Web Title: Ajit Pawar Speaks about Nivedita Mane entry in ShivSena