Video : राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जागावाटपावर अजित पवार म्हणतात...

Ajit-5.jpg
Ajit-5.jpg

पुणे :  काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जागावाटापाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले ''प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला जागा मागण्याचा अधिकार आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जागावाटप करण्यासाठी पक्षाचे नेते निर्णय घेतील. पुण्यातील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

जागावाटपासंबंधी या बाबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला वापर करत समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे. परंतू काँग्रेसला तो फॉर्म्युला मान्य नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे आतापासूनच आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे.

2014च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्यात, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी-काँग्रेसचे पक्षनेते जागावाटपाबाबत नक्की काय भूमिका घेतील याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com