राष्ट्रवादी, काँग्रेसचे 40 जागांवर एकमत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणेकरांना गरजेएवढे पाणी मिळावे 
पुणे शहराला जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढे दिले पाहिजे. मात्र, पाणीकपात करताना पुणेकरांना विश्‍वासात घेतले पाहिजे. पुणेकर नेहमी मदत करण्याच्या भूमिकेत असतात. मात्र, त्यांना विश्‍वासात घ्यायला हवे, असा सल्ला अजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिला. आमची सत्ता असताना पुणेकरांना पाणी कमी पडू दिले नाही, असे त्यांनी सांगितले. 

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे 40 जागांबाबत एकमत झाले आहे. पुण्यासह उर्वरित आठ जागांसदर्भात लवकरच निर्णय होईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. पुण्याच्या जागेचा आग्रह सोडला का, या प्रश्‍नावर मात्र बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगून, पवार यांनी अधिक बोलणे टाळले. 

शिवाजीनगरमधील पाटील इस्टेटशेजारील झोपडपट्टीतील आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांना पवार यांच्या हस्ते विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, नीलेश नीकम, रवींद्र माळवदकर यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवराय पथारी संघटनेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. 

लोकसभेची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेऊन, दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. राज्यातील 40 जागांवर तोडगा निघाला आहे. उर्वरित जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""लोकसभा मतदारसंघातील पक्षांची निवडून येण्याची लक्षात घेऊन जागा वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षांना रोखणे शक्‍य होणार आहे. भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी पुढील आठवड्यात चर्चा करण्यात येणार आहे.'' 

पुणेकरांना गरजेएवढे पाणी मिळावे 
पुणे शहराला जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढे दिले पाहिजे. मात्र, पाणीकपात करताना पुणेकरांना विश्‍वासात घेतले पाहिजे. पुणेकर नेहमी मदत करण्याच्या भूमिकेत असतात. मात्र, त्यांना विश्‍वासात घ्यायला हवे, असा सल्ला अजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिला. आमची सत्ता असताना पुणेकरांना पाणी कमी पडू दिले नाही, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Ajit Pawar talked about NCP and Congress seat sharing for loksabha election