माळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

माळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्‌ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद, इथेनॉलचे टेंडर वेळेत न देणे, एफआरपीचे भिजत घोंगडे आणि आता ऊस वजनकाट्यातील घोळामुळे येथील सभासद व कामगारांचे हाल पाहवत नाहीत. वजनकाट्यात घोळ करताना सत्ताधाऱ्यांना जनाची नाही, मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती,’’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे व संचालक चंद्रराव तावरे यांच्यावर टीका केली.  

पणदरे- कुरणेवाडी (ता. बारामती) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी माळेगाव कारभारावर टीका केली, ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे वैधमापन शास्त्र हे खाते असताना संबंधित अधिकाऱ्यांनी माळेगाव कारखान्याच्या वजनकाट्यात त्रुटी असल्याने कारवाई केली. शेतकऱ्यांपुढे आता कोणत्या तोंडाने पवारांच्या नावाने खडे फोडणार?

अशी प्रतिकूल स्थिती असताना काटा मारून शेतकऱ्यांच्या कष्टाचे शोषण करायला जनाची नाही, मनाची तरी लाज वाटायला हवी. किमान या पुढे तरी दुष्काळ डोळ्यासमोर ठेवून सभासदांचा ऊसगाळपात शंभर टक्के घ्यावा.’’ 
‘‘नीरा देवघर धरणाचे कालवे पूर्णत्वाला आल्यानंतर नीरा डाव्या कालव्याचे पाणी कमी होणार आहे. माळेगाव कारखान्याचे ऊस कार्यक्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे ऊस व पाणी कमी असताना माळेगाव कारखान्याने विस्तारवाढीचा धोका चंद्रराव तावरे यांच्या हट्टापायी झाला. त्यामुळे घास मोठा झाला खरा, परंतु ऊस आणायचा कोठून? कारखान्याला उसाचा घास पुरविताना जिवाचे रान होणार आहे. साखरेचे बाजार खाली आले असून, सध्या अनेक जण सरकारने ठरवून दिलेल्या २९०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्री करीत आहेत. साखरेचे निर्यातीचे धोरण सरकारने विचारात घेऊन मार्ग काढला पाहिजे,’’ अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.   

माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे विरोधात असताना ऊस उत्पादकांच्या एफआरपीसह विविध मागण्या घेऊन पवारसाहेबांच्या दारात आंदोलन करण्यासाठी येत होते. आता का सभासदांना एकरकमी एफआरपी देत नाहीत?
 - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Web Title: Ajit pawar Talking Politics