'...हे महाराष्ट्राला परवडणारे नाही', अजित पवारांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

Ajit Pawar
Ajit Pawar Sakal media

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य नेते मंडळी उपस्थित होती.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांच्या नंतर अजित पवार यांनी जनतेला संबोधन केलं. यावळी त्यांनी राज्यपालांची तक्रार थेट मोदींनाच केली. (Narendra Mpdi inaugurates Pune Metro)

Ajit Pawar
'समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारलं असतं?'; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आठ दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीने आक्षेपही घेतला होता. ठिकठिकाणी राज्यपालांच्या भाषणाचा विरोध करण्यात आला. आज भाषणात अजित पवारांनी राज्यपालांची तक्रार केली. 'मला पंतप्रधान यांना लक्षात आणून द्यायचं आहे की, काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे, असं अजित पवार म्हणाले.

शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा मोठा वारसा आहे, त्याचे पालन केले पाहिजे. तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. याबद्दल मनातस आकस न ठेवता वारसा पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भर सभेत तक्रार केली.

Ajit Pawar
'राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही'

काय म्हणाले अजित पवार?

  • अनेक वर्षी इच्छा होती की ही विकास काम लवकर व्हावी या भूमिपूजन उदघाटन कार्यक्रमाला उपस्थिती राहिले त्याबद्दल आभार.

  • नरेंद्र मोदी ज्यांना आदर्श मानता त्याच शिवाजी महाराज यांची भूमी,छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा पुढे नेण्याचा काम आम्ही करतोय तुम्ही आम्हला सहकार्य केल त्याबद्दल धन्यवाद.

  • काही नेत्याच्या हटापायी मेट्रो सुरू व्हायला १२ वर्ष गेली,पुणेकरांच्या सहनशीलतेला दादा दिली पाहिजे,मेट्रो कशी सुरू करायची याला वेळ गेला,मात्र अखेर काम सुरू झालं अन सुरू झाली.

  • पिंपरी चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज,स्वारगेट ते हडपसर,शिवाजीनगर ते खराडी या मार्ग सुरू करण्यास मदत घ्यावी,गडकरी साहेबांमुळे नागपूर लवकर सुरू झाली,त्यामुळे इतर ठिकाणी मदत द्यावी ही विनंती.

  • विकास कामात राजकारण न आणता काम करू,नदी सुशोभीकरण अन शुद्धीकरण हे प्रकल्प करत असताना पर्यावरण याकडे लक्ष देऊन काम व्हावे तसेच आम्हीही लक्ष देऊ

  • सर्व वाहने पर्यावरणपूरक करू यात ई बस अन मोटारसायकल यांच्या किमती कमी व्हावे हे केंद्राने लक्ष घालावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com