
राज्यात पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सत्तेत आलो. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पुणे शहर व जिल्ह्यातील विकासकामे अधिक गतीने मार्गी लागावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. पण अजूनही, मला पाहिजे तसे कामे होताना दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करत अधिकाऱ्यांनो कामात हलगर्जीपणा करू नका.
पुणे - राज्यात पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सत्तेत आलो. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पुणे शहर व जिल्ह्यातील विकासकामे अधिक गतीने मार्गी लागावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. पण अजूनही, मला पाहिजे तसे कामे होताना दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करत अधिकाऱ्यांनो कामात हलगर्जीपणा करू नका. अन्यथा आपली गय केली जाणार नाही, अशी तंबीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ही तंबी दिली. यावेळी त्यांनी नामोल्लेख न करता, केवळ एक अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे नेमका तो अधिकारी कोण आणि पवार यांचा रोख कोणावर, याचीच चर्चा कार्यक्रम संपल्यानंतर सुरू झाली.
Video:चंद्रकांत पाटील पुन्हा ट्रोल; डॉ. अब्दुल कलामांविषयी दिला चुकीचा संदर्भ
पवार म्हणाले, ‘‘शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामे अधिक गतीने आणि दर्जेदार व्हावीत, हा माझा सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी मी माझ्या मनाप्रमाणे काम करणारे अधिकारी पुण्यात आणत असतो. त्यानुसार पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर मला पाहिजे तसे अधिकारी नियुक्त केले. परंतु यातील काही अधिकारी अजूनही कामात हलगर्जीपणा करत आहेत.’
पुणेकरांनो खबरदारी घ्या! दुसऱ्यांदा विनामास्क आढळल्यास भरावा लागणार 1000 रुपये दंड
Edited By - Prashant Patil