अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर केली टिका

मिलिंद संगई
रविवार, 3 जून 2018

बारामती : "सरकारचे कामच असे सुरु आहे की आम्हाला इच्छा नसतानाही त्यांची लाज काढावी लागते, आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही त्या मुळे लोकशाही मार्गानेच आम्ही आमच्या भावना व्यक्त करु शकतो" , असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टिका केली.

बारामतीत आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले, देशाचे कृषीमंत्री शेतकरी संपाला स्टंटबाजी म्हणतात, शेतकरी सूचना देऊन संपावर जातो, त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करुन त्यांना दिलासा देण्याऐवजी हे मंत्री स्टंटबाजी म्हणतात, त्यांना काही लाज लज्जा, शरम वाटते की नाही. भाजपचे अध्यक्ष शेतक-यांना साले म्हणतात, बळीराजाला दिलासा देणे तर दूरच पण सत्तेची मस्ती यांना आल्याचे हे निदर्शक आहे. जोवर शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाही तोवर या राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर शेतक-यांनी फिरु द्यायला नको, त्या शिवाय यांना जाणीव होणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. 

  • उस उत्पादकांसाठीच पवार गडकरी भेट.

नितीन गडकरी व शरद पवार यांच्या भेटीचा माध्यमांनी वेगळा अर्थ लावला असला तरी राज्यातील उस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गडकरींनी पुढाकार घ्यावा अशी विनंती शरद पवार यांनी त्या भेटीत केल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. येत्या 6 जून रोजी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे, त्यात उत्तरप्रदेशला वेगळा न्याय व महाराष्ट्राला वेगळा अशी भूमिका नको, महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून गडकरींनी यात लक्ष घालण्याची सूचना त्यांना पवारांनी केल्याचे अजित पवार म्हणाले. 

Web Title: ajit pawarcriticize government policies