अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नवी सांगवीत आरोग्य शिबिर

मिलिंद संधान
सोमवार, 23 जुलै 2018

नवी सांगवी - राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पिंपळे सौदागर मध्ये सामान्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने सौदागरातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या या मोफत शिबिरात औंध जिल्हा रूग्णालय समाजसेवा विभागाचे डॉ ताराचंद कचरे व त्यांच्या सहकाऱ्यानी यावेळी दीडशेहुन अधिक रूग्णांची तपासणी केली. यामध्ये बालरोग, स्त्रीरोग, हाडांची तपासणी, आयुर्वेदिक, रक्तदाब, हिमोग्लोबिन, कान, नाक, घसा, डोळ्यांच्या तपासण्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे करण्यात आल्या. 

कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक नाना काटे म्हणाले, " ऐन्शी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पवारसाहेबांच्या उक्तीप्रमाणे आमचे सोशल फाऊंडेशन काम करीत आहे. इतर कोणतेही भपकेबाज कार्यक्रम न करता सर्व सामान्य व गरजवंत लोकांच्या आरोग्याची तपासणी आज आंम्ही अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली. या आधीही असे सामाजिक उपक्रम राबवित आलो आहोत आणि भविष्यातही आणखी समाज उपयोगी कार्यक्रम आमच्या सोशल फाऊंडेशच्या माध्यमातून आंम्ही घेणार आहोत.  "

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे, उषा काळे, निकिता कदम, माजी नगरसेविका शकुंतला टाक, फजल शेख, मीना मोहिते, सविता खरादे व सौदागरातील ग्रामस्त यावेळी उपस्थित होते. यावेळी औध जिल्हा रुग्णालयास लोकमान्य टिळक यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

Web Title: Ajit Pawar's birthday celebrates new health camp