अजित पवारांच्या गाडीची भरारी पथकाकडून तपासणी

मिलिंद संगई-सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

बारामती- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही निवडणूक आयोगाच्या गाडी तपासणी मोहिमेतून सुटले नाहीत. बारामती तालुक्यात सांगवी येथे प्रचारसभेसाठी अजित पवार निघाले असताना त्यांची गाडी भरारी पथकाने थांबवून गाडीची आज (शुक्रवार) तपासणी केली.

सुरवातीला गाडी का थांबविली हे अजित पवार यांना समजले नाही. पण, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणीच्या कामासाठी गाडी थांबविल्याचे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने गाडीची संपूर्ण तपासणी करण्यास सांगत या चौकशीला सहकार्य केले. त्यांच्या गाडीत काहीही नसल्याने तपासणीनंतर लगेचच त्यांची गाडी जाऊ देण्यात आली. या अगोदर या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या गाड्यांचीही चौकशी आयोगाच्या भरारी पथकाने केली.

Web Title: ajit pawar's car cheaked Flight squad