आत्ताचे राज्यकर्ते झोपा काढतात - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - ""राज्य सरकारमधील मंत्री मला सांगतात, "दादा अधिकारी आमचे ऐकतच नाहीत. ते तुमचे ऐकायचे, तेव्हा तुम्ही काय करायचा?' असे सांगून आत्ताचे राज्यकर्ते रोज दुपारी झोपा काढतात. मी सकाळी साडेसात-आठ वाजता बैठका घ्यायचो, तेव्हा अधिकारीही यायचे. त्यासाठी धमक लागते,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी राज्यातील मंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप तोडपाणी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सरकारविरोधात पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोप 10 जूनला पुण्यात होणार आहे. त्यासाठी पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा कसबा मतदारसंघात झाला. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, निरीक्षक हरीश सणस, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, दीपक मानकर, अण्णा थोरात, मोहनसिंग राजपाल, रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका, भाजपची प्रचार यंत्रणा, ईव्हीएममधील गोंधळ, मंत्र्यांचे गैरव्यवहार, महागाई, इंधन दरवाढ यावरूनही पवार यांनी केंद्र, राज्य सरकारला लक्ष केले. 

पवार म्हणाले, ""आगामी निवडणुकांसाठी प्रत्येकाने आतापासूनच झटले पाहिजे. पुणे शहर आणि जिल्ह्यातून पक्षाचे पाच खासदार निवडून आले पाहिजेत.'' 

गिरीश बापटांवर टीका 
या वयात काय बोलावे हे कळत नसलेली व्यक्ती येथील लोकांनी निवडून दिली आहे, असे सांगून पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका केली. कसब्यात प्रयत्न केल्यास आपली ताकद वाढणार आहे. आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, पर्वती मतदारसंघातही मेळावा झाला.

Web Title: Ajit Pawar's criticism on bjp