esakal | अजित पवारांचा निर्णय योग्य : गिरीश बापट
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar's decision is correct said Girish Bapat

गेले २८ दिवस शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या तसेच सरकार स्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक बैठका चालू असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर उभे केले होते. पण, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश असूनही आमच्या मित्रपक्षाने जनादेश डावलून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आमची ३० वर्षाची मैत्री तोडून वेगळा संसार थाटण्याचा प्रयत्न केला​.

अजित पवारांचा निर्णय योग्य : गिरीश बापट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे  : ''आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर आणि भक्कम सरकार अस्तित्वाला आले आहे,'' अशी प्रतिक्रिया खासदार गिरीश बापट यांनी दिली.  यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्री कसबा गणपती मंदिरात आरती करून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.
 


महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ आज सकाळी पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

याबाबत, बापट म्हणाले, ''गेले २८ दिवस शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या तसेच सरकार स्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक बैठका चालू असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर उभे केले होते. पण, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश असूनही आमच्या मित्रपक्षाने जनादेश डावलून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आमची ३० वर्षाची मैत्री तोडून वेगळा संसार थाटण्याचा प्रयत्न केला.आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली.

पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

loading image