अक्षयचा शोध थांबविला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

टाकवे बुद्रुक : येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून स्विफ्ट कार पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या अक्षय जगताप याचा शोध तिसऱ्या दिवशीही लागला नाही. शनिवारी (ता. 3) दुपारी चारच्या सुमारास शोध घेणाऱ्या पथकाने नदीपात्रातील पाणबुड्या बाहेर काढल्या. तीन दिवस शोधाशोध करूनही तो न सापडल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्‍यू पथक व मुळशीतील आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी चारपर्यंत शोध घेतला; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. इंद्रायणी नदीवरील पुलावरून गुरुवारी (ता. 1) एमएच 12 जेयू 4615 ही कार नदीत पडली.

टाकवे बुद्रुक : येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून स्विफ्ट कार पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या अक्षय जगताप याचा शोध तिसऱ्या दिवशीही लागला नाही. शनिवारी (ता. 3) दुपारी चारच्या सुमारास शोध घेणाऱ्या पथकाने नदीपात्रातील पाणबुड्या बाहेर काढल्या. तीन दिवस शोधाशोध करूनही तो न सापडल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्‍यू पथक व मुळशीतील आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी चारपर्यंत शोध घेतला; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. इंद्रायणी नदीवरील पुलावरून गुरुवारी (ता. 1) एमएच 12 जेयू 4615 ही कार नदीत पडली. त्यात संकेत असवले (वय 20) याचा मृत्यू झाला. अक्षय ढगे हा पाण्यातून सुखरूप बाहेर पडला. मात्र, अक्षय जगताप (वय 19) अजून बेपत्ता आहे. शोधासाठी प्रशासनाने यापुढे सहकार्य करावे, अशी मागणी अक्षयच्या नातेवाइकांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay still not found