अक्षता लांडगे यांना विविध संघटनांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - प्रभाग २९ (ड) मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार अक्षता जयराज लांडगे यांना विविध संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला आहे. प्रभागातील जुन्या इमारतींचे पुनर्विकास, हक्काची घरे आदी प्रश्‍न सोडविण्यावर भर देणार असल्याचे लांडगे यांनी प्रचारादरम्यान सांगितले.

लष्कर-ए-लहुजी (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शेंडगे, मराठा विकास संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोंढाळकर, मराठा युवा फाउंडेशनचे संस्थापक सचिन चंद्रकांत शिंदे (पाटील) आदींनी लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मातंग समाजातील १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांसाठी दत्तक घेणे, मालकी हक्काच्या घरांसाठी प्रयत्न, जुन्या इमारती-पूरग्रस्त घरे यांचा पुनर्विकास करणार असल्याचे अक्षता लांडगे यांनी सांगितले. प्रचारफेरी काढून मतदारांशी संपर्क साधून त्यांनी हे आश्‍वासन दिले. मनसेचे झेंडे, घोषणा, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आदींमुळे ही प्रचारफेरी लक्षवेधी ठरली.

पर्वती-नवी पेठ प्रभागात साने गुरुजीनगर, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर येथे मोठ्या प्रमाणावर महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत. येथील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करून त्यांना उत्तम दर्जाची घरे देणे यावर आपला भर राहील, असेही लांडगे यांनी सांगितले. आजवर सत्ताधाऱ्यांनी येथील कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा, जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाचा विचारच केला नाही; मात्र मी याच प्रश्‍नाला अग्रक्रम देणार आहे, असेही त्यांनी प्रचारफेरी दरम्यान सांगितले.

लांडगे या उच्चशिक्षित उमेदवार असल्यानेच त्यांना पाठिंबा देत आहोत, असे महिला मंडळांनी सांगितले. इंग्रजी साहित्य विषय घेऊन पदवी मिळविणाऱ्या लांडगे या निर्भया मदत केंद्राच्या, तसेच ‘निर्भया जेनेटिक मेडिकेअर’च्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या आम्हाला अधिक जवळच्या असल्याचे महिलांनी आवर्जून सांगितले. प्रभाग २९ मधून लोकवर्गणीतून उभ्या राहिलेल्या मुन्ना मैड यांनाही मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.

Web Title: akshta Jayraj Landge mns