आळंदीत येणाऱ्या भाविकांना सुविधा द्या

Alandi
Alandi

पुणे - आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सुविधा देण्यासाठी आणि यात्राकाळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना, तसेच यात्रा सुखकर होण्यासाठी विविध विभागप्रमुख, अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी शनिवारी दिल्या.

आळंदी कार्तिकी यात्रा १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे. असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गायकवाड यांनी विस्तृत आढावा घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, खेडचे उपविभागीय अधिकारी एस. बी. तेली, श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील, मुख्याधिकारी समीर भूमकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, विश्वस्त अभय टिळक आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले की, यात्रेसाठी स्वच्छता, सुविधा, सुरक्षा, आरोग्य या बाबींवर भर दिला जाणार आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल 
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त १८ ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आळंदी येथे भाविक येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीत बदल केला आहे. 

बंद ठेवण्यात येणारे रस्ते - पुणे- आळंदी रस्ता दिघी ते मॅक्‍झीन चौक, मोशी- आळंदी रस्ता डुडुळगाव जकात नाक्‍यापर्यंत, चाकण- आळंदी रस्ता कारवा धर्मशाळा, वडगाव घेणंद- आळंदी रस्ता विश्रांवाडी, मरकळ- आळंदी रस्ता पीसीएस कंपनी फाट्यापर्यंत. पर्यायी मार्ग - पुणे- दिघी मॅक्‍झीन चौक- भोसरी- मोशी- चाकण, मोशी- चाकण- शिक्रापूर, मोशी- भोसरी- मॅक्‍झीन चौक- दिघी, चाकण- मोशी- मॅक्‍झीन चौक- दिघी- पुणे, चाकण- पिंपळगाव फाटा- मरकळ- लोणीकंद, वडगाव घेणंद- पिंपळगाव फाटा- चाकण- नाशिक महामार्ग, मरकळ- सोळू- धानोरे- चऱ्होली खुर्द बाह्यवळण रस्ता, मरकळ- कोयाळी- वडगाव घेणंद- पिंपळगाव फाटा- चाकण, चिंबळी- मोशी- भोसरी- मॅक्‍झीन चौक- दिघी- पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com