संत कासावीस सारे । लाविती पदर डोळियांसी।।

आळंदी (ता. खेड) - माउलींच्या समाधी प्रसंगावर सोमवारी कीर्तन करताना नामदेव महाराजांचे वंशज भावार्थ महाराज नामदास.
आळंदी (ता. खेड) - माउलींच्या समाधी प्रसंगावर सोमवारी कीर्तन करताना नामदेव महाराजांचे वंशज भावार्थ महाराज नामदास.

आळंदी - समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, वीणा मंडपातील समाधी प्रसंगाचे रंगलेले कीर्तन, टाळ मृदंगाचा टिपेला पोचलेला गजर अन्‌ माऊली नामाचा अखंड जयघोष, अशा भारलेल्या वातावरणात ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता माऊलींच्या समाधीवर हजारो वैष्णवांनी तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण केली. संत नामदेवांच्या अठराव्या वंशजांच्या सुश्राव्य वाणीतून माऊलींच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीचे वर्णन ऐकताना अवघी अलंकापुरी गहिवरली.

नामा म्हणे संत कासावीस सारे। लाविती पदर डोळियांसी ।।
हीच भावना अवघ्या आळंदीत होती. भावार्थ महाराज नामदास यांनी कीर्तनात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना, असे म्हणत समाधीप्रसंगाचे वर्णन केले. 

भावार्थ महाराजांकडून परंपरा
कार्तिक वद्य षष्टीच्या दिवशी संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा दिवे घाटात अपघाती मृत्यू झाला. तरीही परंपरेप्रमाणे सोपान महाराज नामदास यांचे पुतणे भावार्थ ज्ञानेश्वर नामदास यांनी वीणा मंडपात माऊलींच्या समाधीप्रसंगाचे कीर्तन तेवढ्याच धीरोदात्तपणे केले आणि परंपरा कायम ठेवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com