पुण्यातील अलंकार टॉकीजजवळील पूल वाहतुकीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे : अलंकार टॉकीजजवळील रेल्वे ओव्हरब्रीजचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते दुपारी दोनच्यादरम्यान हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, निसर्ग हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यापूर्वी काही मार्ग वळविण्यात आले आहेत. म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, निसर्ग हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाडळे पॅलेस चौकाऐवजी नळस्टॉप चौकातून वळून गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉल, नवी पेठ किंवा डेक्कन परिसरात जाता येईल. हा बदल प्रायोगिक स्वरूपात असून, त्याची अंमलबजावणी कालपासून (सोमवार) करण्यात आली आहे. 

त्यानंतर आता पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अलंकार टॉकीजजवळील रेल्वे ओव्हरब्रीजचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

Web Title: Alankar Talkies Bridge will be close For few days