अल्कॉन स्टायलस, कुणाल हाउसिंगला दणका; काळ्या यादीत टाकणार 

अल्कॉन स्टायलस, कुणाल हाउसिंगला दणका; काळ्या यादीत टाकणार 

पुणे - सीमाभिंत पडून पंधरा जणांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्कॉन स्टायलस व कुणाल हाउसिंग या दोन्ही कंपन्यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. त्यांची महापालिकेकडील नोंदणी रद्द करून नवीन प्रस्ताव दाखल करण्यास बंदी घातली आहे. तसेच, कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांना "ब्लॅक लिस्ट' केले जाणार आहे. 

कोंढवा येथे कांचन डेव्हलपर्सकडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे काम करणाऱ्या मजुरांसाठी अल्कॉन स्टायलस या सोसायटीच्या सीमाभिंतीलगत पत्र्याचे शेड उभारून कामगारांची राहण्याची व्यवस्था केली होती. शनिवारी (ता. 29) मध्यरात्री ही सीमाभिंत कोसळून पंधरा जाणांचा मृत्यू झाला. या सोसायटीची सीमाभिंत निकृृष्ट दर्जाची असल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी बिल्डरला पत्र लिहून केली होती. पण अल्कॉन स्टायलस बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केले होते. 

या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली असताना सोमवारी (ता. 1) महापालिकेच्या बांधकाम विभागाने अल्कॉन स्टायलस व कुणाल हाउसिंग या आर्किटेक्‍ट कंपनीची महापालिकेकडील नोंदणी रद्द करून विवेक अगरवाल आणि आर्किटेक्‍ट सुनील हिंगमिरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, हिंगमिरे यांच्याविरोधात कौन्सिल ऑफ आर्किटेक्‍ट यांच्याकडेही तक्रार केली जाणार आहे. या दोन्ही कंपन्यांकडून उत्तर आल्यानंतर त्यांना ब्लॅक लिस्ट केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

महापालिकेने अल्कॉन स्टायलस आणि कुणाल हाउसिंग या दोन्ही कंपन्यांची महापालिकेतील नोंदणी रद्द केल्याने त्यांना नवीन बांधकामासाठी प्रस्ताव दाखल करता येणार नाहीत. त्यांना थेट ब्लॅक लिस्ट करता येत नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आठ दिवसांत त्यांचे उत्तर आल्यावर पुढील कारवाई केली जाईल. 
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com