आळेफाटा : राजुरी येथे मळयात मृतावस्थेत आढळला बिबटया

शेतक-यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहेत
bibatya
bibatyasakal

आळेफाटा: राजुरी येथील एका मळयात मृतावस्थेत सापडला बिबटया याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील गोगडी मळयामधील दुर्गामातानगर मध्ये रहात असलेले उमेश शंकर नायकवडी हे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजुला असलेल्या शेतावर कांद्याला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांणा एक बिबटया मृतावस्थेत आढळून आला.याबाबतची माहिती त्यांणी वनविभागाचे अधिका-यांणा दिली.

bibatya
पुणे जिल्हा परिषदेकडून पाच हजार कामे पूर्ण - आयुष प्रसाद

घटनास्थळी वन अधिकारी संतोष साळुंखे,त्रिंबक जगताप,स्वप्नील हाडवळे यांणी भेट दिली असता त्यांणी त्याचा पंचनामा करून पोस्ट मार्टम साठी माणिक डोह येथील बिबटया निवारण केंद्रात पाठवले आहे.तसेच मृतावस्थेत सापडलेला बिबटया हा नर जातीचा असुन दोन बिबटयांच्या झालेल्या हल्ल्यात याचा जखमी होऊन मुत्यू झाला आहे असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान याच गावातील एका मळ्यातील रहात असलेले अक्षय चासकर यांच्या एका दिड वर्षीय कालवडीवर दि.११ रोजी बिबटयाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली असुन याच शेतक-याच्या एका दोन वर्षीय बालकावर तीन महिण्यापुर्वी बिबटयाने हल्ला गंभीर जखमी केले होते . या बालकावर दोन महिने पुणे या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपचार झाल्याने हा बालक यामधुन बचावला आहे. तसेच राजुरी हे गाव बिबटया प्रवन श्रेत्रात मोडत असुन या गावात ऊसाचे क्षेत्र मोठ्यप्रमाणावर असुन सध्या ऊस तोड चालु असल्याने या भागात वावरत असलेल्या बिबटयांणा लपण न राहीलेल्याने भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीवर येऊन लागले आहेत.

bibatya
तुम्ही ब्लाईंड डेटला गेलाय?; पाहा व्हिडिओ

प्रतिक्रीया- दिपक औटी- माजी सभापती पंचायत समिती जुन्नर

जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील राजुरी,आळे,बोरी बुद्रुक,जाधववाडी हि गावे बिबटया प्रवण क्षेत्रात मोडत असुन बिबट्याचे प्रमाण जास्त असुन या बिबटयांणा पकडण्यासाठी वनविभागाने जास्तीत जास्त पिंजरे लावावेत.

प्रतिक्रीया - ज्ञानेश्वर शेळके उपसरपंच

राजुरी हे बिबटया प्रवण क्षेत्रात मोडत असुन गेल्या काही दिवसांपासून या परीसरात मोठ्या बिबट्याचे हल्ले वाढलेले असुन अनेक शेतक-यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहेत. तसेच सध्या कॅनालला पाणी चालु असुन या दिवसा लाईट रहात नसल्याने त्यामुळे शेतक-यांणा शेतात पाणी भरण्यासाठी जिव मुठीत धरून रात्रीचे जावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने या बिबटयाणा पकडण्याठी पिंजरे लावावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com