अल्काईल अमाईन्सवर दोन दिवसांत गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये 14 ऑगस्ट 2019 रोजी लागलेल्या भीषण आगीची चौकशी सुरू आहे. आग लागलेल्या ठिकाणी केमिकलचा विनापरवाना साठा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीविरुद्ध दोन दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी दिली. 

कुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये 14 ऑगस्ट 2019 रोजी लागलेल्या भीषण आगीची चौकशी सुरू आहे. आग लागलेल्या ठिकाणी केमिकलचा विनापरवाना साठा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीविरुद्ध दोन दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी दिली. 

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स कंपनीत 14 ऑगस्ट 2019 रोजी रात्री भीषण आग लागली होती. आग व धुराचे लोट, केमिकलच्या बॅरेलच्या होणाऱ्या स्फोटांमुळे व अफवांमुळे परिसरातील गावांमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गावांमधील ग्रामस्थ, महिला लहान मुलांना घेऊन भीतीने वीस किलोमीटर लांब निघून गेले होते. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये कंपनीविषयी संताप निर्माण झाला होतो. ही कंपनी त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून झाली. घटना घडताच उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले. तरी कंपनीवर काय कारवाई होणार याबाबत ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण आहे. 

यासंदर्भात घोगरे यांना विचारले असता, त्यांनी अल्काईल कंपनी आग लागलेल्या ठिकाणी रॅनीनिकल कॅथलिक हे केमिकलचा विनापरवाना साठा करण्यात आला होता. त्यामध्ये हायड्रोजन, अमोनिया व इथाईल अल्कोहोल केमिकल घटकांचा समावेश होता. हा साठा 45 टन होता. सदर आगीत हे केमिकल असलेले 300 बॅरल जळाले आहेत. सदर केमिकलचा हवेशी संपर्क आल्याने ही आग लागली आहे. घटना घडल्यानंतर कंपनीचे उत्पादन बंद करण्यात आले असून चौकशी होईपर्यंत कोणताही प्रकारे कंपनी चालू करून दिली जाणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alkyl Amines Chemicals Limited Crime within two days