अजित पवारांच्या बारामतीतील भाषणाकडे सर्वांचेच लक्ष.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All eyes are on Ajit Pawars speech in Baramati

अजित पवारांच्या बारामतीतील भाषणाकडे सर्वांचेच लक्ष....

बारामती - राज्यातील सत्तांतरानंतर आज अजित पवार हे प्रथमच विरोधी पक्षनेते म्हणून बारामतीत आले. नेहमीप्रमाणेच त्यांनी आपला दिनक्रम ठेवलेला होता, सत्तांतरानंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीत कसलाही बदल केला नव्हता, त्याच गतीने त्यांनी आज विकासकामांची पाहणी करत आढावा घेतला.

नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने आज अधिकारी उपस्थित नव्हते मात्र पदाधिका-यांसमवेत त्यांनी विविध विकासकामांना भेटी देत सूचना केल्या. ही कामे वेळेत मार्गी लावण्यासाठीही त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

दुसरीकडे बारामती नगरपालिका व माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार जाहीर मेळाव्यात बोलणार आहेत. सत्तांतरानंतर त्यांची प्रथमच बारामतीत सभा होत असल्याने ते या सभेत काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

बारामती नगरपालिकेसह सर्वच संस्थांवर अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे, मात्र राज्यातील सत्तांतरानंतर महाविकासआघाडीचे भवितव्य कसे असेल, आगामी निवडणूकांना सामोरे जाताना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे की शिवसेना कॉंग्रेससोबत जायचे या बाबतची भूमिका संदिग्ध असल्याने अजित पवार आज काय सूचना देतात या कडेच कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

नगरपालिकेसाठी इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने आजच्या मेळाव्यास मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थितीवर तसेच जिल्ह्याच्या राजकारणाबाबत पवार काय बोलणार या बाबत उत्सुकतेचे वातावरण आहे.

सत्तांतरानंतर आता राष्ट्रवादी विरोधी पक्ष असल्याने कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याबाबत तसेच कोणत्या मुद्यांवर विरोध करायचा या बाबतही अजित पवार मार्गदर्शन करतील, विरोधी पक्ष असल्याने कार्यकर्त्यांचीही भूमिका नेमकी काय असावी या बाबतही ते बोलतील असा अंदाज आहे.

Web Title: All Eyes Are On Ajit Pawars Speech In Baramati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..