पोलिस चौकीतच पोलिसास धक्काबुक्की करणाऱ्या चौघांना अटक 

All four arrested for Bullying the cops At the police station in pune.jpg
All four arrested for Bullying the cops At the police station in pune.jpg

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून पोलिस चौकीमध्ये मदत मागण्यासाठी गेलेल्या दोघांना ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या टोळक्‍याने पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली असून 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता धानोरी पोलिस चौकीमध्ये घडली. 

विनायक अशोक सुर्यवंशी (वय 25), व्यंकट सुब्बाराव पवानाघंटी (वय 25), जीवन अनिल खंडागळे ( वय 22), आशिष अनिल खंडागळे (वय 25 सर्व रा. धानोरी ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक संतोष वेंगले यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू ठोंबरे व त्याचा भाऊ संजय ठोंबरे यांची सुर्यवंशी, पवानाघंडी व खंडागळे यांच्यासमवेत भांडणे झाली होती. या भांडणामुळे राजू, संजय ठोंबरे हे दोघेजण धानोरी पोलिस चौकीमध्ये मदत मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींसह 10 ते 15 जणांनी ठोंबरे यांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यावेळी वेंगले त्यांची समजून काढण्यासाठी गेले. त्यावेळी टोळक्‍याने त्यांनाच धक्काबुक्की केली. तसेच धानोरी पोलिस चौकीचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com