पुण्यात दोन महिन्यातच चारही धरणे फुल्ल !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सूनचे आगमन होते. यंदा पावसाने सुरवातीला ओढ दिली, मात्र जुलैमध्येच पुण्यातील सरासरी ओलांडून कहर केला. त्या मुळे पुढचे 2 महिने जमा होणारे पावसाचे पाणी ही धरणातून सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी चारही धरणांत 25.56 टीएमसी (87.68 टक्के) पाणी होते. 

महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सूनचे आगमन होते. यंदा पावसाने सुरवातीला ओढ दिली, मात्र जुलैमध्येच पुण्यातील सरासरी ओलांडून कहर केला. त्या मुळे पुढचे 2 महिने जमा होणारे पावसाचे पाणी ही धरणातून सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात पाऊस असताना मराठवाडा मात्र अजूनही पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. 

हंगामातील सर्वाधिक विसर्ग पुण्यात सोमवारी सकाळी 11 वाजता होणार असल्यामुळे नदी काठपासून 100 ते 200 मीटरमध्ये महापालिका प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all four dams overflow in Khadakwasla region Pune