अ.नि.स. च्या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा विरोध

all india brahman mahasangha oppose the program of Andhashraddha Nirmoolan Samiti
all india brahman mahasangha oppose the program of Andhashraddha Nirmoolan Samiti

पुणे : अ.नि.स. च्या वतीने रविवार दिनांक 9 सप्टेंबर ला सिंहगड रोड येथे एक शिबीर आयोजित आले आहे. सदर संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आणि शिबीरे होत असतात. या कार्यक्रमाला स्वामी अग्निवेश यांना प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असतील. मात्र सदर कार्यक्रमाच्या आयोजनावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणेचे आनंद दवे यांनी टिका केली आहे.

आनंद दवे यांच्या मते, 'स्वामी अग्निवेश यांचे मागील काही वक्तव्य ही हिंदू धर्म आणि त्यातील परंपरा यांची टीका आणि निंदा करणारी आहेत. सदर कार्यक्रमात बेताल बडबड करून पुण्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील अशी आम्हाला भीती आहे.' 

आनंद दवे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज दत्तवाडी पोलिस अधिकारी यांना भेटून स्वामी अग्निवेश यांना पुण्यात येण्यास थांबवावे किंवा योग्य प्रकारे बोलण्याची समज द्यावी, अशी विनंती केली आहे. 'त्याच आशयाचे पत्र आम्ही शुक्रवारी सकाळी 11 वाजता CP ऑफिस येथे देणार आहोत.' असेही ते म्हणाले.  

'सदर कार्यक्रम हा धार्मिक दहशतवाद यावर आहे, असे आयोजक सांगत आहेत. पण फक्त हिंदू धर्मीय लोकांनाच वक्ते म्हणून का बोलावले आहे? याचे उत्तर आयोजकांनी दयावे अशी विनंती' दवे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com