Vidhan Sabha 2019 : ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा नाहीच; आनंद दवेंचे निलंबन

विनायक बेदरकर 
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. तसेच, महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांना दिशाभूल केल्याप्रकरणी निलंबित केले असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Vidhan Sabha 2019 : कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. तसेच, महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांना दिशाभूल केल्याप्रकरणी निलंबित केले असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

शनिवारी दुपारपासून ब्राह्मण महासंघाकडून निवडणुकीतून माघार घेत चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. सायंकाळी ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे त्यांनी पत्रक काढून चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समाजाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

No photo description available.
अनिल दवे यांनी काढलेले पत्रक 

ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी आणि भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यातील चर्चेनंतर गोविंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून माघार घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.  

No photo description available.
गोविंद कुलकर्णी यांनी काढलेले पत्रक 

रात्री उशिरा ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अद्वैत देहडराय यांनी पत्रक प्रसिद्ध करीत चंद्रकांत पाटील आणि ब्राह्मण महासंघ यांमध्ये समाधानकारक चर्चा झाली नाही. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी त्यांचे परखड मत व्यक्त केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष तेथून निघून गेल्यानंतर संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून स्वाक्षरी घेतली. यातील मजकूर पूर्वनियोजित होता व पत्रकाचा महासंघाचा काही संबंध नसून सदर बेजबाबदार कृत्यासाठी आनंद दवे यांना निलंबित करण्यात येत असल्याचे पत्रक देहेडराय यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
 ‎
याबाबत ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद गोविंद कुलकर्णी सकाळची बोलताना म्हणाले ,''ब्राह्मण महासंघाचा कोणालाही पाठिंबा नाही कोथरूड मतदार संघातून ब्राह्मण संघ महासंघाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. दिशाभूल करणाऱ्या आनंद दवे यांना निलंबित करण्यात आले आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The All India Brahmin Federation did not support Chandrakant Patil And suspended anil dave