Vidhan Sabha 2019 : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

अमोल कवितकर
Saturday, 5 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत  पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत  पाटील यांची आज पुण्यात बैठक झाली. त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.
 

Vidhan Sabha 2019 : पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात बैठक झाली. त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून आगामी सरकारच्या माध्यमातून त्या तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. परिणामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. 
No photo description available.

महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह जितेंद्र कुलकर्णी, प्रवक्ते आनंद दवे आदींच्या स्वाक्षरीने चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत माननीय चंद्रकांत  पाटील यांच्यासमवेत आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ब्राह्मण समाजासाठीचे आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आदींबाबत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्राधान्याने सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता आणि राज्याच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीस ब्राह्मण महासंघातर्फे पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Brahmin Federation support Chandrakant Patil in Kothrud constituency in maharashtra vidhan sabha 2019