अखिल भारतीय नेत्रपरिषद इंदोर येथे संपन्न

Eye Council
Eye Council

पुणे - ७७ वी अखिल भारतीय नेत्रपरिषद इंदोर येथे नुकतीच पार पडली. ३००० हून आधिक नेत्रतज्ञ यामध्ये सामील झाले होते. पुण्यातील नेत्रतज्ञ अरुंधती पांडे यांनी यावेळी लहान मुलांमधील मोतीबिंदू या विषयावर प्रकाश टाकला. 

इंदोर येथील ब्रिलिअंट कॉनव्हेंशन सेन्टर येथे ही परिषद घेण्यात आली. भारतासह, अमेरिका, लंडन, नेपाळ अशा विविध देशातून नेत्रतज्ञ येथे आले होते. जगप्रसिद्ध नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या या परुषदेचे उद्धाटन झाले. अजित बाबू मज्जी हे अध्यक्ष होते. 

मोतीबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्याचा कोरडेपणा, बुबुळ, मागील पडदा (रेटिना), तिरळेपणा अशा विविध विषयांवरिल प्रबंध येथे सादर करण्यात आले. विविध राज्यातील शिकाऊ डॉक्टरांचाही परुषदेत सहभाग होता. 

यावेळी लहान मुलांमधील मोतीबिंदू हा महत्त्वाचा विषय येथे मांडण्यात आला. याबाबत माहिती देतांना लहान मुलांमध्ये मोतीबिंदू झाल्यानंतर लगेच शस्त्रक्रिया करावी असे मत नेत्रतज्ञ अरुंधती पांडे यांनी मांडले. 

तसेच यासाठी शस्त्रक्रिया गृह कसे असावे त्याची रचना कशी असावी. आणि नवीन मार्ग दर्शक तत्वे या संदर्भातही परिषदेत चर्चा झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com