Republic Day : ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून शिवानंद पुजारीची निवड

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनामध्ये ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या शिवानंद पुजारी या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्याला संधी मिळाली आहे.
Shivanand Pujari
Shivanand Pujarisakal
Summary

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनामध्ये ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या शिवानंद पुजारी या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्याला संधी मिळाली आहे.

हडपसर - प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनामध्ये ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या शिवानंद पुजारी या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्याला संधी मिळाली आहे. कर्तव्य पथ (राजपथ) शिबारात तो परेड कमांडर म्हणून काॅन्टिजंटचे नेतृत्व करणार आहे.

देशातील इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रातून ११६ छात्रांची संचलनासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये पुणे ग्रुपमधून पस्तीस छात्र निवडले गेले आहेत. त्यामध्ये दोन महाराष्ट्र बटालियनच्या तेरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश आहे. शिवानंद पुजारी हा मगर महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तसेच दोन महाराष्ट्र बटालियनचा एनसीसी छात्र आहे.

शिवानंदने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक अशी दहा शिबीरे पूर्ण केली आहेत. तसेच शिवानंद पुजारी यांने माळवणकर शुटिंग कॅम्प, आयजीसी इंटर ग्रुप स्पर्धांमध्यही सहभाग घेतला होता. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, 2 महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल फरहाद अहमद तसेच एनसीसी युनिटचे प्रमुख ले. डॉ. धिरज देशमुख यांच्याकडून शिवानंद पुजारी याला मार्गदर्शन मिळाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले, 'आपला विद्यार्थी पथ संचलनामध्ये सहभागी होणे हे महाविद्यालयांसाठी भूषणावह असतेच. त्यातही महाविद्यालयाचा विद्यार्थी ऑल इंडिया परेड कंमांडर म्हणून सहभागी होणे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.'

महाविद्यालयाचे एनसीसी युनिट १९७३ मध्ये सुरू झाले असून दिल्लीतील परेडसाठी आत्तापर्यंत २७ छात्रांची निवड झाली आहे. यावर्षी युनिटमधील तीन छात्रांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाली आहे, अशी माहिती एनसीसी युनिटचे प्रमुख ले. डॉ. धिरज देशमुख यांनी दिली.

छात्र शिवानंद म्हणाला, 'प्रजासत्ताक दिनी पथ संचलनामध्ये सहभागी हेाण्याची आणि राजपथावर चालण्याची प्रत्येक छात्राची मनापासूनची इच्छा असते. ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून संधी मिळाल्याने मोठा आनंद होत आहे.'

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, ले. डॉ. धिरज देशमुख यांनी शिवानंदचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com