वारकरी संगीत संमेलन 28 पासून पुण्यात

वारकरी संगीत संमेलन 28 पासून पुण्यात

पुण्यातील संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन सूस रस्त्यावर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास सोनावणे; तर कार्याध्यक्ष अनिल ससार आहेत. संमेलनाची सुरुवात 28 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता वाद्यपूजनाने होईल. यानंतर आमदार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. समारोपाच्यादिवशी 30 नोव्हेंबरला संमेलनानिमित्त दिला जाणारा गीत-नृत्य-वाद्य पुरस्कार पं. सुरेश गंधर्व यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. 

विश्‍वाला कवेत घेण्याचे सामर्थ्य या आदीम काळापासून असलेल्या संगीतात आहे. देवाचे श्रेष्ठत्व हे वारकरी संगीताचे अधिष्ठान आहे. गावाचे गावपण, संस्कृती या संगीताने जपली आहे. एवढी व्यापक वलये या संगीताला लाभली आहेत, म्हणूनच हे संगीत मी श्रेष्ठ मानतो. 
- डॉ. श्रीपाल सबनीस,
अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन 

काकड आरती, गाथाभजन, जागर, कीर्तन, भारूड, पखवाज वादन, संगीत भजन ही वारकरी संगीताची अंगे आहेत. हेच महाराष्ट्राचे मूळ संगीत आहे. ते लोकांपर्यंत पोचावे आणि त्याची साधना करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ देऊन महाराष्ट्राच्या मातीतील संगीत समृद्ध करण्याचा प्रयत्न संमेलनातून होत आहे. 
- पं. यादवराज फड,
अध्यक्ष, संगीतोन्मेष संस्था 

संमेलनातील कार्यक्रम 
28 नोव्हेंबर : 
दत्तात्रय कांबळे यांचे अभंग गायन 
कृष्णाई प्रभाकर वाळेकर यांचे भारूड 
गोव्यातील प्रचला अमोणकर यांची अभंगवाणी 
29 नोव्हेंबर : 
सुनील पासलकर यांचे भक्तिसंगीत 
दिल्लीतील पं. सुरेश गंधर्व यांची हिंदी संतवाणी 
लक्ष्मण राजगुरू यांचे भारूड 
30 नोव्हेंबर : 
केशव जगदाळे आणि आसाराम साबळे यांची जुगलबंदी 
पं. यादवराज फड यांच्या अभंगवाणीने संमेलनाची सांगता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com