esakal | Vidhan Sabha 2019 : कसब्यातील सर्वच पक्षाचे उमेदवार एकाच ठिकाणी चहाला
sakal

बोलून बातमी शोधा

All party candidates in Kasaba constituency got one place

मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने, कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी इडली सांबर आणि चहा नाष्टा घेत चर्चा घडवुन आणली. प्रचारादरम्यान एकमेकावर नेहमी टीकेची झोड उठविणारे, लोकप्रतिनिधी आज एकत्रित आलेले दिसले.

Vidhan Sabha 2019 : कसब्यातील सर्वच पक्षाचे उमेदवार एकाच ठिकाणी चहाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट (पुणे) : मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने, कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी इडली सांबर आणि चहा नाष्टा घेत चर्चा घडवुन आणली. प्रचारादरम्यान एकमेकावर नेहमी टीकेची झोड उठविणारे, लोकप्रतिनिधी आज एकत्रित आलेले दिसले त्याचं कारण होतं बाळासाहेब मालुसरे यांनी भारावलेला मंडई कट्टा. या वेळी मनसेचे उमेदवार अजय शिंदे ,भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक व काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते गोपाळ तिवारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अजय शिंदे म्हणाले की, “विधानसभेची निवडणूक प्रथमच लढवित असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मागील २५ वर्षापासुन कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहीला आहे, या वेळी आम्ही तो ताब्यात घेऊ आणि कसब्याचा विकास करून दाखवू. यावेळी भाजपच्या उमेदवार  मुक्ता टिळक म्हणाल्या की, गिरीश बापट यांची परंपरा कायम ठेवत, यंदाच्या निवडणुकीत नागरिक मला प्रचंड मतांनी निवडून आणतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीदरम्यान उमेदवाराची चर्चा घडवुन आणल्याने, समाजात चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमाची गरज असल्याची भावनाही टिळक यांनी व्यक्त केली.

यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गोपाळ तिवारी बोलताना म्हणाले की, शहरातील आमच्या जागा निश्चित निवडून येतील. २१ तारखेला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

loading image