सर्वच गाळ्यांचे मूल्य सारखेच असावे - सुरेंद्र जेवरे

मिलिंद संगई
शनिवार, 17 मार्च 2018

बारामती : शहरातील भिगवण चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपालिकेच्या गाळ्यांचे मूल्य नाममात्र असेल तर इतरही सर्वच गाळ्यांचे मूल्य त्या प्रमाणेच करुन द्यावे अशी मागणी येथील भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी केली आहे. 

शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या धो.आ. सातव आणि यशवंतराव चव्हाण उद्योगभवनातील 19 गाळ्यांचे मासिक भाडे किमान 140 तर कमाल पाचशे रुपये इतके आहे. ही माहिती सुरेंद्र जेवरे यांनी माहिती अधिकारात नगरपालिकेकडूनच प्राप्त केली आहे. 

एकीकडे शहरातील नगरपालिकेच्या उद्योगभवनातील अनेक गाळे, हॉल वर्षानुवर्षे रिकामे पडून आहेत. अनेक युवकांना व्यवसाय करण्यासाठी त्यांची गरज आहे, मात्र नगरपालिका त्याचा लिलावच करत नाही, त्या मुळे युवकांच्या रोजगाराच्या संधीवर गदा येत असल्याचे जेवरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

भिगवण चौकातील व्यापारी गाळ्यांना जे मासिक भाडे आकारले जाते तसाच समान न्याय शहरातील इतर व्यापारी गाळ्यांनाही लावायला हवा, अशी मागणी करत सर्वांनाच याच दराने भाडे आकारणी करावी व रिकाम्या गाळ्यांचा लिलाव तातडीने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: All the shops should have the same value - surendra jevare