दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र यावे - बिट्टा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे चेअरमन मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी केले.

सहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे चेअरमन मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी केले.

पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार,’ तर आमदार महेश लांडगे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार राहुल कुल, विचारवंत डॉ. दत्ता कोहिनकर, पद्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, उद्योजक संतोष धनवडे, ऋषी बालगुडे, ॲड. मंदार जोशी आदी उपस्थित होते. 

शिंदे यांच्या वतीने त्यांचे मित्र बळवंत सासवे यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या वीरमाता ताराबाई साष्टे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, चोरडिया शिक्षण संस्थेचे डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, धीरज घाटे, उद्योजक अमित गायकवाड, डॉ. वैशाली जाधव यांचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक शशिकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे आणि मोनिका जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात अभिजित व प्रसेनजीत कोसंबी या बंधूंच्या देशभक्तीपर गीतांनी झाली.

Web Title: All should come together against terrorism Manindarjit Singh