रिपब्लिकनच्या मागणीने खोळंबली ‘युती’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) २८ जागांची मागणी केल्याने युतीबाबत येत्या दोन दिवसांत नव्याने चर्चा सुरू होणार आहे. हा प्रस्ताव पुढे करून भाजपकडून शिवसेनेवर दबाव टाकण्याची शक्‍यता व्यक्त असून या दबावाला शिवसेना किती बळी पडणार, हे लवकरच स्पष्ट होईल. 

महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात भाजप- शिवसेना नेत्यांची सोमवारी बैठक झाली. ही युती होणार की नाही, झालीच तर शिवसेनेला किती जागा मिळणार, यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात असतानाच रिपब्लिकन पक्षाने युतीचा प्रस्ताव सादर केला. रिपब्लिकनच्या नेत्यांनी मकर संक्रांतीचे निमित्त साधत भाजप नेत्यांची भेट घेऊन २८ जागांची यादी दिली. त्यानंतर सोमवारी युतीच्या बैठकीपूर्वी पुन्हा एकदा दोन्ही पक्ष नेत्यांच्या गाठी- भेटी झाल्या. त्यामध्ये येत्या दोन दिवसांत पुन्हा चर्चेसाठी बसण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वडगावशेरीतील जागांवर भर
४१ प्रभागांपैकी दोन प्रभागांत प्रत्येकी दोन जागा, तर अन्य २६ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा रिपब्लिकनकडून मागण्यात आली आहे. या जागांमध्ये सर्वाधिक जागा वडगावशेरी मतदारसंघातील असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: alliance problem by rpi