पाचशे-हजारांच्या नोटांचा युतीकडून निवडणुकीत वापर

narayan-rane
narayan-rane

हडपसर - "नोटाबंदीचा फायदा भाजपप्रणीत नेत्यांनी करून घेतला. युती सरकारने नगरपालिका निवडणुकीत 500 व हजाराच्या नोटांचे मतांसाठी वाटप केले. राज्यात गेल्या दीड वर्षात 3500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दररोज कुपोषित बालके मृत्युमुखी पडत आहेत. "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून केंद्र व राज्य सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील 23 मंत्री भ्रष्ट आहेत,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.

हडपसर विधानसभा कॉंग्रेस पक्षाने हडपसर येथील गांधी चौकात आयोजिलेल्या सभेत राणे बोलत होते. या प्रसंगी विधान परिषद गटनेते शरद रणपिसे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रमेश बागवे, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, प्रशांत तुपे, चंद्रकांत मगर व पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ""पंतप्रधानांनी अच्छे दिनाचे गाजर दाखवून जनतेला बुरे दिन आणले आहेत. देशाच्या सीमेवर रोज सैनिक शहीद होत आहेत, ते त्यांना थांबवता येत नाही. अच्छे दिन आणू न शकलेले हे सरकार अपयशी ठरले असून, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी रोज एक नवीन निर्णय घेत आहे.''

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधताना ते म्हणाले, ""ते रोज भाजपला विरोध करून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. बाळासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वाच्या गुंतवणुकीच्या व्याजावर ते जगत आहेत. मुंबईत 25 वर्षे सत्ता असतानाही त्यांनी मुंबई बकाल करून ठेवली.''
या वेळी शिवरकर यांचे भाषण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com