दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या : नाभिक समाजाची आयुक्तांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

महामंडळाचे पुणे शहराचे अध्यक्ष महेश सांगळे, युवा अध्यक्ष नीलेश पांडे, गजानन पंडित यांच्यासह समाजाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून ही मागणी केली. कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या आधीच पासून सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अधिककाळ दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिक आणि कारागीर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पुणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या अन्य भागात इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामंडळाचे पुणे शहराचे अध्यक्ष महेश सांगळे, युवा अध्यक्ष नीलेश पांडे, गजानन पंडित यांच्यासह समाजाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून ही मागणी केली. कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या आधीच पासून सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अधिककाळ दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिक आणि कारागीर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊन नंतरही व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील अन्य भागातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास शासन आणि महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप सलून व्यावसायिकांना ही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य भागातील दिलेल्या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले

ग्राहक आणि दुकान मालक व कारागिरांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी सर्व अटींचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, असे आश्‍वासनही आयुक्तांना देण्यात आलेल्या पत्रात संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. त्यावर लवकरच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले असल्याचे सांगळे यांनी सांगितले. 

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow To start shops Demand of Salon Society to the Pune Commissioner