काश्मिरींना संविधानिक अधिकार हवेत - अल्ताफ बुखारी

अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी यांचे मत; फिल्म फेस्टिव्हलला भेट
Altaf Bukhari statement Kashmiris need Democratic constitutional rights article 370 pune
Altaf Bukhari statement Kashmiris need Democratic constitutional rights article 370 pune sakal

पुणे : कलम ३७० काढल्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये हिंसाचाराच्या घटना जरी कमी झाल्या असल्या तरी आमची विशेष ओळखच पुसली गेली आहे. तेंव्हापासून आजपर्यंत आमच्याकडे लोकनियुक्त सरकार नाही. निवडणूका केंव्हा होणार, या बद्दल अनभिज्ञता आहे. जम्मू कश्मिरमध्ये लोकशाही प्रक्रिया राबवत आम्हा कश्मिरींना तातडीने संविधानिक अधिकार मिळायला हवे, असे मत जम्मू काश्मीर अपनी पार्टीचे अध्यक्ष सैयद मोहम्मद अल्ताफ बुखारी यांनी व्यक्त केले.

सरहद आयोजित जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा निमित्त पुण्यात आलेल्या बुखारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाला रफी अहमद मीर, पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे, आदी उपस्थित होते. बुखारी म्हणाले, ‘‘कलम ३७० पुर्नस्थापित केले जाईल, यासाठी आमचा न्यायालयावर विश्वास आहे. काश्मिरमध्ये सध्या घडलेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी असून, काश्मिरी पंडितांशिवाय काश्मिर अपूर्ण आहे. आम्हाला लोकशाही, शांतता आणि सुरक्षा नांदवायची आहे. काश्मिरी पंडितांनी खोऱ्या मध्ये परत यावे. असे आवाहन आम्ही करतो.’’ द कश्मिर फाईल्स हा चित्रपट व्यावसायिक असून, त्यामुध्ये पुर्ण सत्य दाखविण्यात आलेले नाही, असे मत बुखारी यांनी व्यक्त केले.

बुखारी म्हणाले....

  • देशातील इतर राज्याप्रमाणेच काश्मिरमधील स्थिती, फक्त टीआरपमुळे जास्त नकारात्मक चित्रण

  • काश्मिरमधील पंडितांसंबंधीच्या घटना दुर्देवी, परंतू धार्मिक विद्वेशाची स्थिती नाही

  • आम्हालाही लोकशाही संविधानिक अधिकार हवेत

उद्योजकांची भेट..

पुणे दौऱ्यावर असलेल्या बुखारींनी पुणे शहरातील चित्रपट निर्माते, पर्यटन उद्योजक आदींची भेट घेतली. जम्म-काश्मिरमधील उद्योगांना चालना मिळावी, तसेच चित्रिकरणाचा उद्योग पुन्हा वाढावा म्हणून त्यांनी उद्योजकांशी या संबंधी चर्चा केली.

सोमवारी चर्चासत्राचे आयोजन

काश्मिर आणि चित्रपट या विषयावर चित्रपट महोत्सवात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्राहलयाच्या सभागृहात सोमवारी (ता.१३) सकाळी साडे दहा वाजता हे चर्चासत्र पार पडणार आहे. या वेळी सकाळचे संपादक संचालक डॉ. श्रीराम पवार, लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीधर लोणी सहभागी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com