पुण्यात वाहतूक कोंडी; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

- बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान चौक (लष्कर ) व सोलापूर रस्त्यावरील वाहतूक स्वारगेटच्या दिशेने व स्वारगेटकडुन सोलापूर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल केल्याने आज सकाळपासून या परिसरामध्ये वाहतूक कोंडी आहेत. -  सोलापूर रस्त्यावरील येणाऱ्या वाहनाना भैरोबा नाला, वानवडी, कोंढ़वा, सैलिसबरी पार्क मार्गे स्वारगेट व मध्यवस्तीमध्ये यावे लागत आहे.
- शंकरशेठ रस्तयावरुन ही पुणे स्टेशन व सैलिसबरी पार्क वाहतूक वळविल्याने कोंडी झाली आहे.
- हडपसर, कोंढवा येथून पुण्यात येणाऱ्या वाहनचालकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिल्याने वाहतुक संथगतीने सुरु आहे.

पुणे : बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान चौक (लष्कर ) व सोलापूर रस्त्यावरील वाहतूक स्वारगेटच्या दिशेने व स्वारगेटकडुन सोलापूर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल केल्याने आज सकाळपासून या परिसरामध्ये वाहतूक कोंडी आहेत. त्यामुळे सोलापूर रस्त्यावरील येणाऱ्या वाहनाना भैरोबा नाला, वानवडी, कोंढ़वा, सैलिसबरी पार्क मार्गे स्वारगेट व मध्यवस्तीमध्ये यावे लागत आहे. शंकरशेठ रस्तयावरुन ही पुणे स्टेशन व सैलिसबरी पार्क वाहतूक वळविल्याने कोंडी झाली आहे. हडपसर, कोंढवा येथून पुण्यात येणाऱ्या वाहनचालकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिल्याने वाहतुक संथगतीने सुरु आहे.

 हे मार्ग आहेत बंद 
- नमाज पठणाच्या वेळी गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग  
- सकाळी दहा ते सात या कालावधीत सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठणाच्या वेळी पुर्णपणे बंद 
- सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान
- सोलापूर रोडने मम्मादेवी चौकात येथे जाणारी वाहतूक, गोळीबार चौकाकडे जाणारा मार्ग 
- भैरोबा नाला ते गोळीबार मैदान भैरोबा नाला येथे बंद 
- कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी 

या पर्यायी मार्गाचा वापर करावा
- गोळीबार चौक- डाव्या बाजूला वळून सीडीओ चौक- उजवीकडे वळून गिरीधर भवनचौक-उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जावे 
- लुल्ला नगर येथून येणार्‍यांनी-खाण्या मारूती चौक- खटाव बंगला चौक- नेपियार रोड- मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक- भैरोबा नाला येथून गिरीधर भवन चौक
- सल्सबरी पार्क सीडीओ चौक- भैरोबानाला येथून जावे 
- मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्ग किंवा कमांड हॉस्पिटल मार्ग वळून पुढे जाने 
- प्रिन्स ऑफ वेल रोडने किंवा भैरोबानाला-वानवडी बाजार चौक येथून जावे 
- वाहनांनी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून पुढे जावे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alternative route for Traffic congestion in Pune for today