दुचाकी चालविताना कायम हेल्मेटचा वापर करावा - पोलीस उपायुक्त अशोक मोराळे

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 29 जून 2018

लोणी काळभोर (पुणे) : रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडतात. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या डोक्याला हेल्मेट नसल्याचे समोर आले आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरल्यास संभाव्य अपघातामध्ये आपला जीव वाचू शकतो, त्यासाठी दुचाकी चालविताना कायम हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे केले.

लोणी काळभोर (पुणे) : रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडतात. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या डोक्याला हेल्मेट नसल्याचे समोर आले आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरल्यास संभाव्य अपघातामध्ये आपला जीव वाचू शकतो, त्यासाठी दुचाकी चालविताना कायम हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे केले.

कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवारी (ता. 29) 'हेल्मेट जनजागृती मोहीम' राबविण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मोराळे यांनी वरील आवाहन केले. यावेळी लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका आदिती कराड, डॉ. राम, मुख्य व्यवस्थापक आशिषकुमार दोषी यांच्यासह हॉस्पिटलमधील रुग्णांचे नातेवाईक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश दाते यांनी केले. दरम्यान हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांचे नातेवाईक, पोलीस, पत्रकार व इतर दुचाकीचालकांना सुमारे दोनशे हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी अशोक मोराळे म्हणाले,"दुचाकीवरील अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने अपघातग्रस्तांना गंभीर दुखापत होते किंवा अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. मागील वर्षभरामध्ये झालेल्या रस्ते अपघातामध्ये दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण सुमारे 70 टक्के आहे. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्याने 90 टक्क्याहून अधिक जणांनी आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरामध्ये एकट्या पुणे शहरात सुमारे 300 ते 400 लोकांनी हेल्मेट न घातल्याने रस्ते अपघातामध्ये त्यांचा बळी गेला आहे. यावरून सरासरी प्रत्येक दिवसाला एक जणाचा बळी जात असून 25 ते 35 वर्षाच्या तरुणांची यामध्ये संख्या मोठी आहे. विश्वराज हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपून घेतलेली 'हेल्मेट जनजागृती मोहीम' ही कौतुकाची गोष्ट आहे."

यावेळी आदिती कराड म्हणल्या, "मागील सहा महिन्यामध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातांची आकडेवारी घेवून अपघातामध्ये जखमी किंवा मृत्यू पावणाऱ्या लोकांची आम्ही माहिती गोळा केली. त्यामध्ये रस्त्यावरील अपघातामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक होते तर संबंधित दुचाकीस्वरांच्या डोक्याला हेल्मेट नेसल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वप्रथम दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करून हेल्मेटच्या वापराविषयी जनजागृती करण्याचा निर्णय आम्ही घेतला." तसेच आगामी काळात समाजहिताचे अनेक उपक्रम घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कराड यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: always use helmet to avoid injuries said deputy commissioner ashok morale