वैविध्यपूर्ण चित्रांच्या विश्वात रसिक रममाण 

Amazing art painting exhibition
Amazing art painting exhibition

पुणे : ग्रामीण स्त्रीचे विलोभनीय सौंदर्य, नदीकाठी वसलेले मंदिर अन्‌ झाडांच्या सावलीतही उजळून निघालेली पायवाट... अशा वैविध्यपूर्ण चित्रांच्या विश्वात रसिक रममाण झाले. बारा चित्रकारांनी एकत्र येऊन काढलेल्या विविध विषयांवरील प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "सुंबरान आर्ट फाउंडेशन'ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात रसिकांना चित्रांचे विविधांगी जग अनुभवता येणार असून वास्तववादी, सर्जनात्मक आणि अमूर्त शैलीतील चित्रे पाहता येतील. 
या प्रदर्शनाचे उद्‌घाटन कलाछाया संस्थेच्या विश्वस्त प्रभा मराठे यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब गुरव, व्यावसायिक सुरेंद्र करमचंदानी, प्रा. सुधाकर चव्हाण आणि चित्रा मेटे उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्रकार मुरली लाहोटी, प्रा. जयप्रकाश जगताप, प्रा. दिलीप कदम, प्रा. श्रीकांत कदम, प्रा. उमाकांत कानडे, शंकर गोजारे, गोविंद डुंबरे, दीपक सोनार आणि राम खरटमल आदींची व्यक्तिचित्रांपासून ते निसर्गचित्रांपर्यंतची सुमारे 32 चित्रे मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 21 फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत गोखलेनगर येथील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सर्वांसाठी खुले राहील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com