जपानच्या राजदूतांची पु. ल. उद्यानाला भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

धायरी - भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाण अधिक दृढ झाली पाहिजे. पुणे महापालिकेने उद्यानाची उत्तम देखभाल राखली आहे. पुणे आणि ओकायामा यांच्यातील मैत्रीचे हे प्रतीक चांगले जपले आहे. येथे उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव आल्याचे जपानचे राजदूत हिरामात्सु यांनी सांगितले. 

हिरामात्सु यांनी बुधवारी सकाळी पत्नी पॅटरिशीया यांच्यासह सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानास भेट दिली. या वेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, सहायक अधीक्षक संतोष कांबळे, नगरसेविका मंजूषा नागपुरे आणि भारत-जपान असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. समीर खळे, उपाध्यक्ष अमित आंबेडकर, सचिव अमोद देव, स्वाती भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. 

हिरामात्सु यांनी उद्यानाची पाहणी केली. तसेच उद्यानाच्या उत्तम स्थितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

भारत-जपान मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले असून, पुन्हा येथे येण्याचे आमंत्रण पुणेकरांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी या वेळी दिले. पुण्याची आठवण म्हणून महापौरांनी जपानी पाहुण्यांना पुस्तक भेट दिले. 

Web Title: Ambassadors of Japan visit pu la deshpande garden