Ambegaon : वृद्ध दाम्पत्यांना फसवुन लूटमार करणारे चार अट्टल दरोडेखोर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambegoan

Ambegaon : वृद्ध दाम्पत्यांना फसवुन लूटमार करणारे चार अट्टल दरोडेखोर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील जाधवमळ्यात गोविंद भगवंत जाधव (वय ७७ वर्ष ) व नंदा गोविंद जाधव ( वय ७० वर्ष ) या वृद्ध दाम्पत्यांना लक्ष्य करून रात्रीच्या वेळी घरात घुसून लूटमार करून दरोडा टाकणारे चार अट्टल दरोडेखोरांना अवघ्या आठच दिवसात जेरबंद करून संगमनेर तालुक्यातून संशियाताना ताब्यात घेण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

गुरुवार (दि.१७) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून धक्काबुक्की करत चाकुने धाक दाखवून अंगावरील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.पारगाव कारखाना पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता.

अशाच प्रकारे तालुक्यातच थोरांदळे येथे बुधवार (दि.८) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी ज्येष्ठ दांपत्यास चाकूचा धाक दाखवत साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती यासंबधी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .दोन्ही घटनामध्ये साम्य दिसत असल्याने याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती.

श्री. शिळीमकर यांनी या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, हेड कॉस्टेबल साबळे, राजू मोमीन, एन.पी.सी वारे, पो. कॉ. अक्षय नवले, सुपेकर, वीरकर असे पथक तयार केले होते. सदर पथक गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्याने दरेवाडी भागात सापळा लावून आकाश फड याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे सदर गुन्ह्यांची चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे त्याचे इतर चार साथीदार रवींद्र भाऊसाहेब फड ( वय ३० रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर ) वैभव दिगंबर नागरे ( वय २० रा.दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर ) अतिष बाळासाहेब बडवे (वय २३ रा. पिंपरी लौकी ता. संगमनेर जि. अ नगर ) नंदकुमार पवार ( वय २१ रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर ) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

सदर आरोपींकडे गुन्ह्यामध्ये चोरून नेलेल्या सोन्याच्या दागिन्या बाबत विचारपूस केली असता ते दागिने हे साकुर (ता. संगमनेर) येथील साई आदर्श को. ऑ. सोसायटी मध्ये तारण ठेवल्याचे सांगितले आहे. या सदर गुन्ह्यातील तीन आरोपी यांना मंचर व एक आरोपीस पारगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर व त्यांचे पथक करत आहे.