आंबेगाव : IPS सुरेश मेंगडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मान

उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (२०२०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
IPS सुरेश मेंगडे
IPS सुरेश मेंगडेSakal

मंचर : मेंगडेवाडी-निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुपुत्र नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त सुरेश सावळेराम मेंगडे (आयपीएस) यांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (२०२०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे सोमवारी (ता.२१ मार्च) समारंभ झाला. मेडल, प्रमाणपत्र,

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

यापूर्वी मेंगडे यांना “पर्यावरण संवर्धन’ पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित देण्यात आला. तुरची (ता.तासगाव जि.सांगली) या दुष्काळी परिसरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये मेंगडे कार्यरत होते. त्यावेळी पाण्याचे दुर्भिक्ष होते. दूरवरून पाणी आणण्याची व्यवस्था करून पडीक व खडकाळ जमिनीवर दोन हजार ५०० वृक्षांची लागवड मेंगडे व त्यांच्या सहकारी यांनी केली. सध्या २५ फुट उंचीचे वृक्ष झाले आहेत. त्यामध्ये फळझाडे व इतर वृक्षांचा समावेश आहे. या विशेष प्रयत्नांची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रास २०१३ मध्ये ''वनश्री पुरस्कार'' देऊन सन्मानित केले होते.

मुंबई राजभवन : नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त सुरेश सावळेराम मेंगडे (आयपीएस) यांना “उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (२०२०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

“निरगुडसर मेंगडेवाडी, ता.आंबेगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले.२५ वर्ष पोलीस दालत आतापर्यंत काम केले आहे. विविध गंभीर गुन्हे उघडकीस आणले. अतीउत्कृष्ट सेवा,जातीय सलोखा, गंभीर गुन्ह्यांची गतिमान उकल व तपास तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या सर्व कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती पोलीस पदक हा सर्वोच्च पुरस्कार मला मिळालेला आहे. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.

-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त आयपीएस गुन्हे शाखा नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com