आंबेगाव तालुक्यात 13 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह; एकूण बाधितांचा आकडा पोहचला...

In Ambegaon taluka 13 patients reported positive
In Ambegaon taluka 13 patients reported positive

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या हळूहळू शिरकाव होऊन एकूण बाधित रुग्ण 96 झाले असून, तालुका शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातही मंचर हे तालुक्याचे हॉटस्पॉट ठिकाण झाले आहे. काल रात्री तालुक्यात 13 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.     
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आंबेगाव तालुक्यात काल घेतलेल्या 81 स्वॅबपैकी 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. लांडेवाडी येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लांडेवाडी येथील 51 वर्षीय व 19 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील सर्व रस्ते सील केले असून, दुकाने बंद आहेत. ''नागरिकांनी घराबाहेर जाऊ नये. घरातच रहा, सुरक्षित रहा'', असे आवाहन आढळराव यांनी केले आहे.     

मंचर हे तालुक्याचे हॉटस्पॉट ठिकाण झाले असून एकूण रुग्ण 22 झाले असून अॅक्टीव्ह रुग्ण 17 आहेत. काल सापडलेल्या 8 रुग्णांपैकी एक 23 वर्षीय, एक 45 वर्षीय, एक 21 वर्षीय व 25 वर्षीय महिला आहेत. तसेच एक 21 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय पुरुष आहेत. यातील एक महिला मेडिकल दुकानात कामाला होती. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 22 रुग्णांपैकी एकाचे निधन झाले आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनमध्ये झिरो संख्या असणारे मंचर गाव आता हॉटस्पॉट ठिकाण झाले आहे. सरपंच दत्ता गांजळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.     

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

कोलदरे येथे एक 47 वर्षीय महिला पॉझीटीव्ह झाली आहे. कोलदरे येथील एकाच घरातील तीन रुग्ण उपचार घेत आहेत. त्या घरातील एक 12 वर्षाचा मुलगा पॉझिटीव्ह झाला असून तो नारोडी येथे नातेवाईकांकडे राहत आहे. पारगाव येथील 38 वर्षीय स्थानिक पुरुष पॉझीटीव्ह झाला आहे. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे म्हणाले, काल 8 रुग्णांना घरी सोडण्यात आले. एकूण 56 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून 37 रुग्ण मंचर व पुणे येथे उपचार घेत आहेत. 

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com